Whatsapp Game / Quiz
मराठी म्हणीचा रंगतदार खेळ
मराठी म्हणीचा रंगतदार खेळ
मराठी म्हणीचा रंगतदार खेळ
आजचा खेळ थोडा गमतीचा आहे
म्हणी ओळखायचा
अद्याक्षरे दिलेली आहेत तुम्ही दिलेल्या अद्याक्षरावरून म्हणी ओळ्खयच्या आहे
उदा. अ ते मा -- अति तेथे माती.
१. दे दे दं
२. चो म चां
३. व ते वां
४. पु पा मा स
५. ए ना ध भा चिं
६. आ बि ना
७. अ ना गा पा ध
८. उं मां सा
९. झा मु स ला
१०. वा लं गा श
११. आ जी बा उ
१२. न फुं सो इ ति गे वा
१३. मा म मा ज
१४.दा क का
१५. घ मा चु
१६. इ आ ति वि
१७. न ल स वि
१८. क ना त्या ड क
१९. आ अं घे शिं
२०. ए गा बा भा
चला सुरू करा .....!!!
- १ - देखल्या देवा दंडवत,
- २ - चोराच्या मनात चांदणे,
- ३ - वड्याचे तेल वांग्यावर,
- ४ - पुढे पाट मागे सपाट,
- ५ - एक ना धड भाराभर चिंध्या,
- ६ - आयत्या बिळावर नागोबा,
- ७ - अडला नारायण गाढवाचे पाय धरी
- ८ - उंदराला मांजर साक्ष,
- ९ - झाकली मूठ सव्वा लाखाची,
- १० - वासरात लंगडी गाय शहाणी,
- ११ - आयजीच्या जीवावर बायजी उदार,
- १२ - नळी फुंकली सोनारे इकडून तिकडे गेले वारे,
- १३ - माय मरो मावशी जगो,
- १४ - दाम करी काम,
- १५ - घरोघरी मातीच्या चुली,
- १६ - इकडे आड तिकडे विहीर,
- १७ - नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न,
- १८ - कर नाही त्याला डर कशाचा,
- १९ - आली अंगावर घेतली शिंगावर,
- २० - एक गाव बारा भानगडी
Whatsapp Game मराठी म्हणीचा रंगतदार खेळ
Reviewed by Nishant Rane
on
March 04, 2020
Rating:
No comments: